सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत हा प्रकल्प ग्रामस्थांच्या सेवेत समर्पित करण्यात आला.
अधिकृत माहितीनुसार, ग्रामीण भागात वाढत असलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. गावपातळीवर प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि योग्य व्यवस्थापन करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे.
उद्घाटनावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन आणि त्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे हे गावाच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. स्वच्छतेबाबत सातत्य राखल्यास ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गावात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: शिराळा तालुक्यातील या गावात बिबट्याचा हल्ला; तीन शेळ्या व बोकड मृत्युमुखी, उपाययोजनांची मागणी.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









