सांगली : सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी ‘MH-10 EX’ ही नवीन नोंदणी मालिका 9 मार्च 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील दुचाकी वाहनांच्या वाढत्या नोंदणीमुळे विद्यमान मालिकेतील क्रमांक संपत आल्याने ही नवी मालिका सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ‘MH-10 EX’ मालिकेसोबतच वाहनधारकांना आकर्षक किंवा पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. अशा क्रमांकांसाठी निर्धारित शुल्काच्या तिप्पट फी भरून अर्ज करता येणार असून क्रमांक देताना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर नोंदणी करण्यात येईल.
पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करताना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड यापैकी कोणत्याही ओळखपत्राची छायांकित प्रत तसेच ई-मेल आयडी देणे आवश्यक आहे. हे क्रमांक ‘वाहन 4.0’ या संगणकीय प्रणालीवर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दिले जाणार आहेत.
एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास 10 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक दिला जाईल, असेही RTO कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
आकर्षक नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना.
- म्हैसाळ यात्रेत पार्क केलेली मोटारसायकल चोरी; वैरण बाजार परिसरातील प्रकार
- सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांत अडकले ; प्रशासन सतर्क
- सांगलीत 9 मार्चपासून दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या









