मिरज : घरची आर्थिक अडचण, मुलगा आजारी… आणि याचाच फायदा घेत ‘गुरुजी’ म्हणून ओळख करून दिलेल्या व्यक्तीने एका महिलेची तब्बल ३ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना मिरजेत समोर आली आहे.
संगीता देऊळकर या मिरजेत घरगुती मेस चालवतात. त्यांच्या मेसमध्ये नियमित जेवायला येणाऱ्या तुषार आळतेकर याने त्यांना कोल्हापूरच्या एका ‘गुरुजी’ची ओळख करून दिली. हे गुरुजी अघोरी पूजा करून घरात सुख-समृद्धी आणतात, आजारी मुलांना बरे करतात, असे त्याने सांगितले होते.
काही दिवसांनी हे गुरुजी त्यांच्या साथीदारांसह देऊळकर यांच्या घरी आले. घरात पूजा केली तर व्यवसाय वाढेल, असे सांगून सुरुवातीला ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर “आणखी पूजा करावी लागेल”, “बोकडाचा बळी द्यावा लागेल”, असे सांगत पुन्हा पैसे घेतले.
पुढे तर त्यांनी तुमच्या घराच्या मागे गुप्तधन आहे असे सांगितले आणि पूजा करून त्यांनी काही दागिने काढून दाखवले आणि ते खरे असल्याचा विश्वासही निर्माण केला. त्यानंतर हे गुप्तधन शुद्धीकरण केल्याशिवाय उघडू नका, असे सांगून कापडात बांधून दिले.
दरम्यान, देऊळकर यांच्या मुलाला काहीतरी ‘लागीर’ झाली असल्याचे सांगून आणखी मोठी पूजा करण्यासाठी तब्बल २.५० लाख रुपये मागण्यात आले. मुलगा बरा होईल या आशेने देऊळकर यांनी नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले, दागिने गहाण ठेवले आणि गुरुजीला पैसे दिले.
काही दिवसांनी संशय आल्याने गुरुजीने गुप्तधन म्हणून दिलेले कापड उघडून पाहिले असता त्यात बनावट सोने असल्याचे लक्षात आले. पैसे परत मागितले असता गुरुजीने टाळाटाळ करत काही रक्कम परत केली, तरी उर्वरित ३ लाख २२ हजार रुपये परत केले नाहीत.
या प्रकरणी शशीकांत कांबळे उर्फ (गुरुजी) रा. कोल्हापूर, सुरज (पूर्ण नाव माहीत नाही), प्रणाली वाघमारे आणि तुषार आळतेकर यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: कृष्णा व्हॅली शाळेसमोर ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी.
- सांगली मनपाचा १०६५ कोटींचा अर्थसंकल्प; पाणी, स्वच्छता, लाईट व पर्यावरणासाठी मोठी तरतूद
- Miraj News : ‘गुरुजी’ म्हणाले गुप्तधन काढतो, मुलाला बरा करतो… मिरजेत महिलेची ३.२२ लाखांची फसवणूक
- Sangli Accident : कृष्णा व्हॅली शाळेसमोर ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
- आटपाडीच्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर रिलीज; सुबोध भावे यांच्या आवाजामुळे वाढली उत्सुकता
- सांगलीत गॅस वितरणात बदल; आता OTP पडताळणीनंतरच मिळणार घरपोच सिलिंडर
- Sangli Travels Bus Fire: सांगलीत पहाटे स्टेडियमसमोर ट्रॅव्हल्स बसला आग; अग्निशमन दलाची तत्परता, तासाभरात आटोक्यात









