Miraj Republic Day Special Train 2026 : सांगली–मिरज रेल्वे प्रवाशांना दिलासा; प्रजासत्ताक दिनानिमित्त धावणार विशेष रेल्वे

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रजासत्ताक दिनानिमित्त धावणार विशेष रेल्वे, मिरज जंक्शन | फोटो : संकलन – Sangli Today

मिरज : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडी जाहीर केली आहे. भुसावळ–मिरज–भुसावळ मार्गावर ही विशेष गाडी चालवण्यात येणार असून, सांगली व मिरज रेल्वे प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक 01209 भुसावळ–मिरज विशेष ही रेल्वे २३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ येथून सुटणार आहे. तर गाडी क्रमांक 01210 मिरज–भुसावळ विशेष ही रेल्वे २६ जानेवारी २०२६ रोजी मिरज येथून धावणार आहे.

ही विशेष रेल्वे मनमाड, पुणे, सातारा आणि सांगली मार्गे धावणार असून, प्रवाशांसाठी ती पूर्णतः अनारक्षित (Unreserved) असणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

रेल्वेच्या माहितीनुसार, या विशेष गाडीची एकूण रचना १८ डब्यांची असून, प्रवासासाठी इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करण्यात येणार आहे. ही गाडी केवळ एक-एक फेरीसाठी (Single Trip) चालवण्यात येणार आहे.

दरम्यान, या विशेष रेल्वेमुळे मिरज, सांगली, कराड, सातारा आणि पुणे मार्गावरील प्रवाशांना पर्यायी व अतिरिक्त प्रवासाची सोय उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: सहकारतीर्थ स्व. गुलाबराव पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत अभिवादन.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा