सांगली : माजी खासदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगलीचे शिल्पकार सहकारतीर्थ स्व. गुलाबराव पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली (Sangli District Central Co-operative Bank Ltd.) येथील मुख्य शाखा परिसरात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात स्व. गुलाबराव पाटील यांच्या सहकार, शेती तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाला उजाळा देण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासात ग्रामीण अर्थव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून सहकार चळवळीला निर्णायक दिशा देण्याचे कार्य स्व. गुलाबराव पाटील यांनी केले, असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ व ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, नगरसेविका प्राजक्ता सनी धोतरे, सनी धोतरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या वेळी नेमिनाथ बिरनाळे, इलाही बारूदवाले, पैगंबर शेख, अजय लोखंडे, समीर मुजावर, मौला व्हांटमोरे, सागर मुळे, रघुनाथ नार्वेकर, अनिल मोहिते, अजय धोतरे, हरून पठाण, अनिल नांगरे, बँकेचे अधिकारी एस एम काटे, शिवाजीराव पाटील, सतीश सावंत, अशोक माने, पी वाय सूर्यवंशी, भास्कर निकम, सौ. पी ए पाटील, प्रकाश पाटील, सतीश पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्व. गुलाबराव पाटील यांच्या विचारांचे अनुकरण करत सहकाराच्या माध्यमातून जनसेवा सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा: समृद्ध पंचायतराज अभियानाची अंतिम मुदत वाढवली; ही वाढीव मुदत अंतिम संधी.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










