विटा : विटा शहरात लोखंडी गेटखाली अडकून गंभीर जखमी झालेल्या दुर्मिळ किंग कोब्रा सापाला सर्पमित्र, वनविभाग आणि पशुवैद्यकीय पथकाच्या समन्वयातून यशस्वी उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. ही घटना वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
१२ जानेवारी रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास विटा–साळशिंगे रस्त्यावरील मंगल जगताप यांच्या घराजवळ लोखंडी गेटखाली एक साप अडकून जखमी झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व सर्पमित्र विवेक भिंगारदेवे यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांच्या टीममधील ओम सुतार घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत हा साप किंग कोब्रा असून तो गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर विवेक भिंगारदेवे स्वतः घटनास्थळी जाऊन जखमी सापाला पकडून तातडीने त्याला विटा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले. तसेच खानापूर वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर विलास पावळे यांना याबाबत माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकृत मार्गदर्शनानुसार आवश्यक परवानगी घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश लवटे यांच्या देखरेखीखाली सापावर उपचार सुरू करण्यात आले.
डॉ. लवटे, सर्पमित्र व वन्यजीव रक्षक टीम महाराष्ट्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे दोन तास शस्त्रक्रिया करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर सलग आठ दिवस सापाला दवाखान्यात आणून वैद्यकीय उपचार देण्यात आले.
उपचार पूर्ण झाल्यानंतर किंग कोब्रा पूर्णपणे बरा झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर वनविभागाच्या उपस्थितीत विवेक भिंगारदेवे, ओम सुतार, ओंकार कोळी, अख्तर शिकलगार, सोहेब शिकलगार, रेंज फॉरेस्ट ऑफिसर विलास पावळे, वनरक्षक अशोक खापरकर व तौसिफ काझी यांच्या उपस्थितीत त्या सापाला सुरक्षितपणे जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या घटनेमुळे स्थानिक स्तरावर वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश गेला असून सर्पमित्र, वनविभाग आणि पशुवैद्यकीय पथकाच्या समन्वयाचे कौतुक होत आहे.
हेही वाचा: समृद्ध पंचायतराज अभियानाची अंतिम मुदत वाढवली; ही वाढीव मुदत अंतिम संधी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










