मिरज : मिरज शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला यश आले आहे. पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
सिनर्जी हॉस्पिटल परिसरातून मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रजपूत मंगल कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईत आयुब अब्दुलरशीद मन्ना (वय 24) आणि संदीप सूर्यकांत येलूरकर (वय 38, दोघे रा. बुधगाव, ता. मिरज) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी चौकशीत संशयितांनी मिरज शहरासह कर्नाटकातील सदलगा परिसरातूनही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व डी. बी. पथकाने केली.
हेही वाचा: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत लिपिक पदांची भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









