Miraj News Today : हुबळी ते दादर जाणाऱ्या चालुक्य एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीत रविवारी रात्री मोठा गोंधळ उडाला. एका प्रवाशाने संशयास्पद पिशवी पाहून रेल्वे सुरक्षा दलाला माहिती दिली असता, तपासात त्या पिशवीत पाचशेच्या नोटांचे तब्बल 55 बंडल आढळले.
रेल्वे सुरक्षा दल व स्थानिक पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला प्रवाशांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळाल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र प्रत्यक्षात तपासानंतर या सर्व नोटा खेळण्यातील बनावट नोटा असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.