Miraj Politics : मिरजेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) लढतीची शक्यता

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Miraj Municipal Election Bjp vs Ncp Ajit Pawar Possibility | (फोटो : Sangli Today)

Sangli News | मिरज : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच प्रमुख पक्षांनी संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. इच्छुकांच्या बैठका, पक्षप्रवेश आणि युतीच्या चर्चा यामुळे मिरजेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काँग्रेस पक्षाने शहर जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात समन्वयावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, महायुतीकडून भाजपने निवडणुकीसाठी आघाडीची भूमिका घेतली असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट), जनसुराज्य पार्टी आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबत समन्वयाचे संकेत दिले आहेत. भाजपकडून प्रभागनिहाय तयारी सुरू असल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून देण्यात येत आहे.

मात्र, मिरजेत अलीकडेच झालेल्या काही महत्त्वाच्या पक्षप्रवेशांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजप मिरजमध्ये आपली ताकद स्वतंत्रपणे वापरणार की काही जागांवर राष्ट्रवादीसाठी जागा सोडणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सध्याच्या घडामोडी पाहता मिरज शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी मैत्रीपूर्ण पण थेट लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत युतींचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर मिरजेतील राजकीय समीकरण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: एफआरपी थकीत; कारखान्यांवर कारवाईची मागणी, राजू शेट्टींचे साखर आयुक्तांना निवेदन.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा