पाटगावमध्ये १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
बालविवाह प्रकरणासंदर्भातील प्रतीकात्मक छायाचित्र

मिरज : पाटगाव (ता. मिरज) येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ७ रोजी दुपारी ग्रामसेवकांना मंदिरात हा विवाह पार पडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही विवाह लावण्यात आल्याचे समजताच ग्रामसेवक विनायक मोरे यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

या प्रकरणी पतीसह संबंधित कुटुंबीयांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार अल्पवयीन मुलीचा विवाह करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

हेही वाचा: सांगली–मिरजेत अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर छापे; 25 सिलिंडर जप्त, तिघांवर गुन्हा दाखल.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा