ST Bus Concession: आनंदाची बातमी! दिवाळीत एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्डची सक्ती ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल; वाचा नवा निर्णय

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
(प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): एसटी महामंडळाच्या लालपरीतून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व नगरीकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाने सवलतीचे तिकीट काढण्यासाठी अनिवार्य केलेल्या ‘एनसीएमसी’ (NCMC) स्मार्ट कार्डची सक्ती आता तूर्तास ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल केली आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी किंवा महिलांनी अजूनही हे कार्ड काढलेले नाही, त्यांनाही पूर्वीप्रमाणेच नेहमीच्या ओळखपत्रावर सवलतीत प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा: ​कल्याण ते लातूर प्रवास आता अवघ्या ४.५ तासांत! माळशेज घाटाखाली मोठा बोगदा; ‘जनकल्याण एक्सप्रेसवे’ला लवकरच मंजुरी, पाहा संपूर्ण रूट आणि तपशील.

ऐन सणासुदीत नियम का बदलावा लागला? 

राज्य परिवहन महामंडळाने १ ऑक्टोबर २०२६ पासून एसटीच्या प्रवासात सवलत मिळवण्यासाठी ‘वन नेशन, वन कार्ड’ या धोरणांतर्गत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले होते. कार्ड नसेल तर सवलत न देता पूर्ण तिकीट आकारण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हा नियम लागू करताना ग्रामीण भागात मोठा गोंधळ उडाला.

गाव-खेड्यातील महिलांपर्यंत याची पुरेशी माहिती पोहोचलेली नव्हती. त्यातच अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असणे, इंटरनेटच्या अडचणी आणि केंद्रांवर लागणाऱ्या मोठ्या रांगा यामुळे कार्ड मिळवण्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. अनेक बसेसमध्ये तिकीट काढताना वाहक (कंडक्टर) आणि महिला प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग घडत होते.

हेही वाचा: लाडक्या बहिणींच्या खात्यात एकदम ₹७,५०० जमा होणार? बँक खाती रिकामी करणारा नवा ट्रॅप! शासनाचा अधिकृत नियम काय सांगतो पाहा.

केवळ १.१० कोटी कार्डांचेच वाटप; प्रशासनाची माघार 

प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यभरात सवलत घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे, परंतु त्या तुलनेत आतापर्यंत केवळ १ कोटी १० लाख एनसीएमसी कार्डांचीच नोंदणी आणि वितरण होऊ शकले आहे.

विशेषतः ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत अर्ध्या तिकिटात प्रवास करणाऱ्या लाखो गरजू महिला अजूनही कार्डविना राहिल्याचे निदर्शनास आले. ही मोठी अडचण ओळखून, मिरज आगार व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार आता ७ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी कार्डची अनिवार्यता पूर्णपणे शिथिल करण्यात आली आहे.

प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?

  • महिलांना ५०% सवलत सुरळीत: ‘महिला सन्मान योजने’चे अर्धे तिकीट आता कार्ड नसले तरी चालू राहील. आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवून महिलांना प्रवास करता येईल.
  • ज्येष्ठांना दिलासा: ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांच्या नेहमीच्या ओळखपत्रावर मोफत किंवा सवलतीचा प्रवास पूर्वीसारखाच करता येईल.
  • कार्ड काढण्यासाठी मुदत: आता सवलतधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत कार्ड काढून घेण्यासाठी जवळपास २ महिन्यांची सवड मिळाली आहे.

हेही वाचा: हयातीचा दाखला काढताना बँक खात रिकाम; निवृत्त मुख्याध्यापकाला ८.३९ लाखांचा गंडा, पेन्शनधारकांसाठी सुरक्षित पद्धती कोणत्या?.

प्रवाशांना एसटी प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

ही मुदतवाढ तात्पुरती देण्यात आली असून ३१ डिसेंबरनंतर पुन्हा कार्ड सक्तीचे केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सवलतधारक प्रवाशांनी शेवटच्या दिवसांची वाट न पाहता, राज्य परिवहन महामंडळाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजंटकडे जाऊन आपली एनसीएमसी कार्ड नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

📢 लाडकी बहीण योजनेसह महाराष्ट्रातील ईतर शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा