जत : मुचंडी-जत मार्गावरील विजापूर-गुहागर महामार्गावर ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अमोल अशोक सावंत (वय 25, रा. मुचंडी, ता. जत) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11.40 वाजण्याच्या सुमारास अमोल सावंत दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
या प्रकरणी ट्रेलर चालक सोनू मुसाहिब खान (वय 36, रा. बिहार) याच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार.
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी
- Sanjita Mohapatra : सांगली मनपाला नवे आयुक्त; सत्यम गांधी यांची बदली, संजीता मोहपात्रा नव्या आयुक्त
- सांगलीत 3 ते 5 एप्रिल विशेष मतदार कॅम्प; नाव, माहिती तपासण्याची संधी










