Namo Run Marathon Sangli 2025 | सांगली : नशामुक्त भारत संकल्पाला बळकटी देण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने ‘नमो रन मॅरेथॉन 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. “नशा छोडो – राष्ट्र जोडो” या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सांगलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही मॅरेथॉन येत्या रविवार, 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता सांगलीतील पुष्पराज चौकातून सुरू होणार आहे. सर्व वयोगटांसाठी सहभाग खुला असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. नोंदणीसाठी आयोजकांनी गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2025 आहे.
महत्वाची अपडेट (27 सप्टेंबर 2025):
आयोजकांनी कळवले आहे की, काल रात्रीपासून सुरु असलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे तसेच हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ‘नमो रन मॅरेथॉन 2025’ तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल. नागरिकांना व सहभागी स्पर्धकांना काळजी घेण्याचे आणि आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Sangli Marathon बक्षिसे
स्पर्धेत विजेत्यांना 1 ते 5 क्रमांकानुसार रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याशिवाय 10 प्रोत्साहन पारितोषिक व सर्व स्पर्धकांना टी-शर्ट आणि सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. टी-शर्टचे वाटप स्पर्धास्थळी सकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान होईल.

नियम व अटी
- सर्व खेळाडूंना नाव नोंदणी आवश्यक आहे.
- नोंदणीची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
- प्रवेश विनामूल्य असून विजेत्यास 01 ते 05 क्रमांकाचे रोख रक्कम ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल.
- खेळाडूंना काही दुखापत झाल्यास त्याला आयोजक किंवा संयोजक जबाबदार राहणार नाहीत.
- खेळाडूंनी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी.
हेही वाचा: कर्नाटकातील व्यापार्याचा स्वतःच्याच लुटीचा बनाव; पोलिस तपासात सत्य उघड.