लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्यास अटक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रतीकात्मक फोटो – Sangli Today

सांगली : वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखेच्या पथकाने अटक केली आहे. माधवनगर (ता. मिरज) परिसरात घडलेल्या दागिने चोरी प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ₹1.20 लाख किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एक वृद्ध महिला कामावरून घरी परतत असताना दुचाकीस्वाराने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क साधला. काही अंतरावर नेल्यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी जायचे असल्याचे सांगत, गळ्यातील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. आणि याच संधीचा फायदा घेत आरोपीने दागिन्यांना हिसडा मारून पलायन केले होते.

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी एका ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने सापळा रचत त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने माधवनगर परिसरात दागिने चोरी केल्याची कबुली दिली.

दस्तगीर गुलाब शेख (वय 44, रा. शाहू कॉलनी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, अशा प्रकारे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने किंवा बँक–पैशांच्या नावाखाली वृद्ध नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना वाढत असल्याने, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगलीतील शाळेचे कार्यालय सील; कर थकबाकीदारांवर सांगली मनपाची जप्तीची धडक कारवाई सुरु.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा