सांगली : शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती, गैरहजेरी आणि त्याचे प्रमाण अचूकपणे नोंदवण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाईन हजेरी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यासह राज्यातील पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमांच्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या नव्या प्रणालीत विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचीही ऑनलाईन उपस्थिती नोंदवली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विद्या समीक्षा केंद्र (VSK) या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबवली जात आहे. राज्यातील काही शाळांमध्ये ही व्यवस्था आधीपासून कार्यान्वित असून उर्वरित शाळांमध्ये ती टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शाळेत दिवसभरात एकदा विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवली जाणार असून, त्याची जबाबदारी संबंधित वर्गशिक्षकांकडे असेल. वर्गशिक्षकांना मोबाईल फोन किंवा संगणकाच्या सहाय्याने ही नोंद सहज करता येणार आहे. तर शिक्षकांच्या ऑनलाईन हजेरीची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे.
या हजेरी नोंदींची पडताळणी करण्यासाठी विस्तार अधिकारी तसेच गटशिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून उलट तपासणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे शाळांमधील उपस्थिती व्यवस्थेबाबत अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










