Padalkar Kesari Bailgada Sharyat 2025 | सांगली (आटपाडी) : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त “पडळकर केसरी” नावाने भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी खरसुंडी रोड, झरे येथे होणार आहे.
स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकासाठी १ लाख रुपये, तर इतर क्रमांकांसाठी देखील रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत मुख्य बक्षिसांसोबतच कॉटर फायनलसाठीही स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या बैलगाडा शर्यतीत सांगली जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर आणि सातारा भागातील गाडीवान मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या पारंपरिक स्पर्धेची उत्सुकता परिसरात चांगलीच वाढली असून स्थानिक आयोजक समितीने यासाठी तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा: ईश्वरपूर व आष्ट्यात बंद, तर सांगलीत पडळकर समर्थकांकडून पोस्टरला दुग्धाभिषेक.