इस्लामपूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) आणि लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी इस्लामपूरात २२ सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आवाहन केले आहे.
जारी केलेल्या पत्रकात शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, “जयंत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. स्व. राजारामबापू पाटील यांच्या वारशाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”
या आंदोलनात प्रदेश पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलन सोमवारी (दि.२२) सकाळी ९ वाजता इस्लामपूरातील राजारामबापू पतसंस्था नाट्यमंदिरासमोरून सुरू होणार आहे.
हेही वाचा: कवठेमहांकाळ ‘स्पेशल 26’ बनावट छापा प्रकरणी आणखी दोघे गजाआड, सूत्रधार फरार.



