सांगली : पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी केले आहे.
12 वी नंतर पदवी तसेच पदव्युत्तर (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सांगली येथे 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करणे बंधनकारक आहे.
राज्यातील महानगरपालिका, विभागीय व जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि शासकीय वसतिगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या भटक्या जमाती – क (धनगर समाज) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, असे विद्यार्थी पात्र ठरतील. जिल्हा मुख्यालयावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 43 हजार रुपये, तर तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 38 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली विभागाकडून करण्यात आले आहे.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









