सांगली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा 22 वा हप्ता शुक्रवार (13 मार्च) रोजी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील हप्त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना थेट ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमातून सायंकाळी 5 वाजता हा निधी वितरीत केला जाणार आहे. यावेळी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर 13 मार्च हा दिवस “PM-Kisan उत्सव दिवस” म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंचायत कार्यालये, कृषी विज्ञान केंद्रे (KVK), मंडई तसेच विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
दरम्यान, PM-Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात.
हेही वाचा: सांगलीत अंध दिव्यांग मुलांचा क्रिकेट सामना; 14 मार्चला चिंचबाग मैदानावर आयोजन.
- अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’
- सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती
- कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या
- 7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; बुधगाव येथे 14 मार्चला विशेष शिबिर









