सांगली : सांगली जिल्ह्यात शनिवार (14 मार्च) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदिती उदय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी दिली.
या लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय सांगली, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात येणार आहे.
लोकअदालतीत फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, बँकेची दिवाणी दावे, नियमित दिवाणी दावे, भूमि संपादन प्रकरणे तसेच कौटुंबिक वादाशी संबंधित प्रकरणे ठेवता येणार आहेत.
याशिवाय चलनक्षम दस्तऐवज (N.I. Act 138) प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे तसेच वीज, टेलिफोन, पाणीपट्टी, घरपट्टी आणि बँक वसुलीशी संबंधित दावापूर्व प्रकरणेही लोकअदालतीत निकाली काढण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या प्रकरणांचा तडजोडीतून निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: PM-Kisan योजनेचा 22 वा हप्ता उद्या खात्यात; सांगलीतील शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










