सांगली, दि. 13 : सांगली शहरात वाहनांसाठीच्या एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर होताना दिसत आहे. दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही एलपीजी पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
कुपवाड ते संजयनगर रोडवरील एका एलपीजी पंपावर शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणात रिक्षांची गर्दी झालेली दिसून आली. पंपावर जवळपास 70 ते 80 रिक्षा गॅस भरण्यासाठी रांगेत उभ्या असल्याचे दिसून आले.
रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी वाहनांसाठीचा एलपीजीचा दर सुमारे 55 रुपये होता. मात्र सध्या तो सुमारे 80 रुपयांपर्यंत वाढल्याची माहिती चालकांनी दिली. दरात झालेल्या 25 रुपयांच्या वाढीमुळे रिक्षाचालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर होत असल्याची चर्चा वाहनधारकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असल्याने अनेक रिक्षाचालक पंपांवर रांगेत थांबून गॅस टाकी फुल करताना दिसत आहेत.
LPG दरवाढीमुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता सांगलीतील रिक्षाचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात 14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत; रखडलेली प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याची संधी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










