Sambhaji Bhide Controversial Statement Dandiya Sangli | सांगली : सांगलीत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला आहे. दुर्गामाता दौडीदरम्यान धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे म्हणाले, “गणपती उत्सव व नवरात्र दांडिया खेळून वाटोळे केले. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे.”
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी घेतलेल्या नवरात्र दुरुस्तीच्या शपथेचा उल्लेख करून हिंदवी स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच त्यांनी भारतीय संविधानावरही निशाणा साधत, “आपली लायकी त्या संविधानात नाही, “विद्वान लोक पोटात मुरड आल्याप्रमाणे ‘संविधान, संविधान’ म्हणतात. कसल संविधान बोलता?” असे विधान केले.
भारतातील गुलामगिरीच्या इतिहासावर भाष्य करताना भिडे म्हणाले की, “भारत हा 1300 वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला गुलामीची लाज न बाळगणाऱ्या निर्लज्ज लोकांचा देश आहे.”
त्यांच्या या विधानामुळे सांगलीसह राज्यभरात संताप व्यक्त होत असून दांडियावरून नवरात्रीच्या उत्सवात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
हेही वाचा: सांगलीत 28 सप्टेंबर रोजी ‘नमो रन मॅरेथॉन 2025’.