Sangli ZP Alert : समृद्ध पंचायतराज अभियानाची अंतिम मुदत वाढवली; ही वाढीव मुदत अंतिम संधी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत सांगली जिल्हा परिषदेची अधिकृत सूचना | फोटो : Sangli Today

सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची सूचना असून समृद्ध पंचायतराज अभियानाची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत असलेली ही मुदत आता 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सांगलीकडून देण्यात आली आहे.

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे कामकाज, नोंदी, विविध उपक्रमांची अंमलबजावणी तसेच मूल्यांकनासाठी ही मुदत देण्यात आली होती. मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये कामकाज अद्याप अपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर ही वाढीव मुदत देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतींनी अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी पूर्ण करणे, आवश्यक नोंदी व दस्तऐवजीकरण अद्ययावत करणे, तसेच ऑनलाइन माहिती वेळेत भरावी. यासोबतच ग्रामसभा, लोकसहभाग आणि शासकीय योजनांचा समन्वय साधून कामकाज पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाकडून ही वाढीव मुदत अंतिम संधी म्हणून पाहिली जावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ठरलेल्या कालावधीनंतर कामकाज अपूर्ण राहिल्यास त्याचा थेट परिणाम गुणांकन व मूल्यांकनावर होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून पारदर्शक, लोकाभिमुख आणि सक्षम ग्रामपंचायती घडवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी या वाढीव मुदतीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: कडेपूर अंगणवाडीत रंगली ‘यशोदा माता अंगत-पंगत’; जिल्हा परिषद CEO विशाल नरवाडे यांची भेट.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा