सांगली : महिला व बालआरोग्य विषयक जनजागृतीच्या उद्देशाने कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील अंगणवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘यशोदा माता अंगत-पंगत’ या उपक्रमाला जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी भेट दिली.
या वेळी त्यांनी अंगणवाडीतील महिलांसोबत प्रत्यक्ष पंगतीला बसून भोजन केले. तसेच महिलांशी थेट संवाद साधत हिमोग्लोबिनची पातळी, सकस आहाराचे महत्त्व तसेच पोषणयुक्त आहाराच्या सवयी याबाबत मनमोकळी चर्चा केली.
महिला व बालकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी अंगणवाडी केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये पोषण व आरोग्याबाबत जागरूकता वाढते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रशासन व अंगणवाडीतील महिला यांच्यातील थेट संवादामुळे प्रत्यक्ष पातळीवरील अडचणी समजून घेण्यास मदत होते, असेही या भेटीदरम्यान अधोरेखित झाले.
हेही वाचा: सांगली महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष; गुरुवारी मुंबईत चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित होणार.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










