सांगली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तसेच सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे सांगली जिल्ह्यात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हाभरात तसेच महापालिका हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहन तपासणी सुरू करण्यात आली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः काही प्रमुख चौकांना भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबरपासून महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्या अनुषंगाने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (SST) कार्यरत असून, जिल्ह्यातील प्रमुख प्रवेश मार्ग, चौक आणि संवेदनशील ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे.
नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिक आणि युवक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. या काळात कुठेही बेकायदेशीर कृत्य, हुल्लडबाजी, मद्यधुंद वाहनचालना किंवा आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. मोटार वाहन कायद्याचे नियम काटेकोरपणे राबवले जात असून, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील एकूण 25 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असून, सांगली आणि मिरज या उपविभागांतील सहा पोलीस हद्दींमध्ये विशेष दक्षता घेण्यात आली आहे. कोणीही अफवा पसरवत असल्यास किंवा कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन वर्षाचे स्वागत शांततेत, नियमांचे पालन करत आणि सुरक्षित वातावरणात करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा: सांगली एसटी आगाराला मिळाल्या 100 नव्या बसेस; मात्र बसटंचाईचा प्रश्न कायम.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










