Sangli Accident News | मिरज : रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला. दादासाहेब भीमराव माने (रा. मिरज) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी शमशुद्दीन शरफुद्दीन मुलाणी (रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) आणि दादासाहेब माने हे दोघे दुचाकीवरून महामार्गावरून जात होते. प्रवासादरम्यान शमशुद्दीनने वेगावर ताबा गमावल्याने दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले.
अपघातात पाठीमागे बसलेले दादासाहेब गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप शमशुद्दीनवर करण्यात आला असून याप्रकरणी भीमराव दादू माने यांनी शमशुद्दीन मुलाणी याच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: कृष्णा–वारणा नदी प्रदूषणावर कारवाई; ४३.१८ कोटी दंड.