Sangli : बिटकॉईन मधून नफा मिळवून देण्याचे आमिष, आईचे पाच तोळ्याचे गंठण गहाण ठेवले

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sangli Bitcoin Fraud Case September 2025

Sangli Bitcoin Fraud Case | सांगली : बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक झाल्याची विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. या फसवणुकीत संशयितांनी पीडित तरुणाला आईचे सोन्याचे गंठण गहाण ठेवण्यास प्रवृत्त केले आणि त्यातून लाखो रुपयांचा व्यवहार केला.

फिर्यादी नीलेश गणेश पाटील (वय २०, रा. संजयनगर, सांगली) हा शिक्षण घेत असताना त्याची काही जणांशी ओळख झाली. या ओळखीतून मिहीर चंद, तन्वेश पवार, अमित सहानी आणि वासू यांनी त्याला बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. नीलेशकडे भांडवल नसल्याने त्यांनी त्याला त्याच्या आईचे दागिने गहाण ठेवण्यास प्रवृत्त केले.

नीलेशने आईचे सुमारे पाच तोळ्यांचे गंठण संशयितांच्या ताब्यात दिले. मिहीर याने साथीदारांच्या मदतीने ते गंठण ज्वेलर्सकडे गहाण ठेवले. या व्यवहारातून त्याला दोन लाख रुपये मिळाले. त्यापैकी ६३ हजार रुपये नीलेशला देण्यात आले, परंतु उर्वरित रक्कम न दिल्याने त्याला फसवणुकीचा संशय आला. वारंवार मागणी करूनही ना पैसे मिळाले, ना गंठण परत मिळाले.

शेवटी त्रस्त होऊन नीलेशने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली फसवणुकीची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हेही वाचा: काँग्रेसची महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू, रणनीतीवर सविस्तर चर्चा.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.