Sangli Politics News | सांगली : संस्कृती रक्षणाच्या नावाखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मोठी इशारा सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या सभेत विकृतीचे प्रतीक मानून प्रतीकात्मक रावण दहन केले जाणार आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “या सभेत मोठ्या प्रमाणावर जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नासवणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे.”
सभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून एक फोटो रिलीज करण्यात आला आहे. त्यात “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नासवली कुणी? इतरांच्या आयांचा, बहिणींचा अपमान कुणी केला? स्वार्थासाठी जातीय मांडणी कुणी केली?” अशा मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सांगलीतील पावसाळी हवामान आणि पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षितरीत्या ही सभा आयोजित केली जाईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल, खरीप पिकांचे नुकसान, द्राक्ष बागायतदार चिंतेत.