Sangli Politics News | सांगली : भारतीय जनता पक्षाने 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सांगलीत इशारा सभा आयोजित करण्याचे नियोजन केले होते. मात्र, राज्यातील मुसळधार पावसाची आणि पूरस्थितीची गंभीर पार्श्वभूमी लक्षात घेऊन आता हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी माहिती दिली की, ही सभा सांगलीतील नेमिनाथनगरमधील राजमती हॉलमध्ये होईल; परंतु येथे केवळ मर्यादित मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्तेच उपस्थित राहतील. जनतेसाठी या सभेची ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ढंग यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती नासवणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी आणि “विकृतीच्या रावणाचे दहन” करण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन सभा घेतल्याने वाचणारी रक्कम सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी दिली जाणार आहे.
सभेनंतर राजमती हॉलच्या आवारात प्रतीकात्मक विकृतीच्या रावणाचे दहन करण्यात येणार आहे.
हेही वाचा: मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले, शेकडो घरांत पाणी, 40 रस्ते-पूल बंद.