Sangli Crime News | सांगली : शहरातील शांतीनगर भागात कौटुंबिक वाद व अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खूनप्रकरणी आरोपी पतीस दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना रविवारी उघडकीस आली. आरोपी प्रशांत एडके (वय ३५) आणि पत्नी काजल प्रशांत एडके शांतीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशांतने घरातच धारदार चाकूने पत्नी काजलच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला.
घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
हेही वाचा: कवठेएकंद येथील शोभेच्या दारू स्फोटप्रकरणी सात जखमींविरोधात गुन्हा दाखल.