सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोनेतारण कर्जाची मर्यादा वाढवली; १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli DCC Bank Gold Loan Valuation Rate Update 2026 | फोटो सौजन्य : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (अधिकृत संकेतस्थळ)

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली यांनी सोनेतारण कर्जाच्या मूल्यांकन दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत परिपत्रकानुसार हे सुधारित दर १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार असून, ते नव्याने मंजूर होणाऱ्या सोनेतारण कर्ज खात्यांनाच लागू राहतील.

बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सध्याचा सोन्याचा बाजारभाव प्रति १० ग्रॅम ₹1,69,044 धरून कर्ज मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यानुसार

  • चोख सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹10,000 म्हणजेच प्रति 10 ग्रॅम कमाल ₹1,00,000,
  • तर लाखी सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹7,600 म्हणजेच प्रति 10 ग्रॅम कमाल ₹76,000 इतक्या मर्यादेपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे ग्राहक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून अधिक भांडवल उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. बँकेने सर्व शाखांना या बदलाची माहिती नोटीस बोर्ड व प्रसिद्धी फलकांवर प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: सांगलीतील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! विहीर, पंप, सोलर व सिंचनासाठी लाखोंचे अनुदान.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा