सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या काही विकासकामांबाबत नागरिकांकडून तक्रारी व प्रश्न उपस्थित होत असतानाच, महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी 31 जानेवारी रोजी शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची सद्यस्थिती तपासली. आरोग्य सुविधा, पायाभूत कामे, वाहतूक व्यवस्था, फुटपाथ विकास तसेच उद्यानांच्या कामांची प्रगती आणि दर्जा याचा आढावा यावेळी घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना अपेक्षित गती नसल्याचे आणि दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उपअभियंता महेश मदने यांच्यासह संबंधित विभागांचे तांत्रिक अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.

फोटो सौजन्य : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका
आरोग्य व नागरी सुविधा
विश्रामबाग परिसरातील वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या कामाची पाहणी करताना काही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून आले. रुग्णालय नागरिकांच्या सेवेत कधी सुरू होणार, याबाबतची सद्यस्थिती आयुक्तांच्या लक्षात आली. तसेच हनुमाननगर येथील अग्निशमन केंद्र आणि नाट्यगृहाच्या प्रलंबित कामांचाही आढावा घेण्यात आला.
उद्याने व क्रीडा सुविधा
रमाई उद्यानाच्या सुशोभीकरण कामाची तसेच प्रतापसिंह उद्यानातील ‘बर्ड गार्डन’ प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. आमराई परिसरातील सिंथेटिक ट्रॅकच्या कामाबाबत दर्जा आणि सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांची तपासणी करण्यात आली, जेणेकरून खेळाडूंना प्रत्यक्ष वापरात अडचणी येऊ नयेत.
पायाभूत सुविधा व फुटपाथ
NCAP अंतर्गत सुरू असलेल्या फुटपाथ विकासकामांबाबत पुष्पराज चौक ते प्रबोधनकार ठाकरे चौक आणि पोरेज TVS शोरूम ते शासकीय विश्रामधाम या मार्गांवरील कामांची प्रगती तपासण्यात आली. याशिवाय झुलेलाल चौक, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग गणपती मंदिर चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक तसेच मिरजेतील मिशन हॉस्पिटल चौक येथील सुशोभीकरण कामांचीही पाहणी करण्यात आली.
बाजारपेठ, वाहतूक व पार्किंग
सांगली फिश मार्केट आणि मिरज गवळी कट्टा येथील सुधारणा कामांचा आढावा घेताना नागरिक व व्यावसायिकांच्या दैनंदिन सोयींचा विचार कितपत करण्यात आला आहे, याची तपासणी करण्यात आली. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता सार्वजनिक बस सेवा आणि पार्किंग व्यवस्थेबाबतही सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, या सर्व प्रकल्पांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कधी आणि किती प्रभावीपणे मिळतो, याकडे आता स्थानिक नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष राहणार आहे.
हेही वाचा: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोनेतारण कर्जाची मर्यादा वाढवली; १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू.
- Gold Rate Today: दिवाळी खरेदीत सोन धडाम; २२K आणि २४K चे भाव किती उतरले? पाहा पीएनजीचे आजचे ताजे दर
- FASTag Local Pass: टोल नाक्यावर रांगेत थांबण्याचा मनस्ताप संपला! ‘राजमार्गयात्रा’ ॲपवरून घरबसल्या कसा काढायचा लोकल पास? जाणून घ्या नियम
- Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सांगली, कोल्हापुरात पुन्हा वेग; कोणत्या जिल्ह्यातून किती किमी जाणार? पाहा सविस्तर आकडेवारी
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; २८ ऑक्टोबरनंतर भाव आणखी कोसळणार की तेजी येणार? खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे दर (२५ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: दिवाळी सणासाठी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? खात्यात १५०० जमा होणार की ३०००? पाहा नेमकी स्थिती
- Maharashtra Weather: राज्यात धो-धो पाऊस? २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हवामानात मोठा उलटफेर; उकाड्यात पावसाची चाहूल









