सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली यांनी सोनेतारण कर्जाच्या मूल्यांकन दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत परिपत्रकानुसार हे सुधारित दर १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार असून, ते नव्याने मंजूर होणाऱ्या सोनेतारण कर्ज खात्यांनाच लागू राहतील.
बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सध्याचा सोन्याचा बाजारभाव प्रति १० ग्रॅम ₹1,69,044 धरून कर्ज मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यानुसार
- चोख सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹10,000 म्हणजेच प्रति 10 ग्रॅम कमाल ₹1,00,000,
- तर लाखी सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹7,600 म्हणजेच प्रति 10 ग्रॅम कमाल ₹76,000 इतक्या मर्यादेपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामुळे ग्राहक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून अधिक भांडवल उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. बँकेने सर्व शाखांना या बदलाची माहिती नोटीस बोर्ड व प्रसिद्धी फलकांवर प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा: सांगलीतील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! विहीर, पंप, सोलर व सिंचनासाठी लाखोंचे अनुदान.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










