सांगली : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विहीर, सिंचन सुविधा, पंप, सोलर पंप, यंत्रसामुग्री आदींसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात असून पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र, 7/12 उतारा, 8-अ उतारा असणे बंधनकारक असून आधारकार्डशी संलग्न बँक खाते आवश्यक आहे. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची कोणतीही अट नसली तरी दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. एकदा या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याला पुढील पाच वर्षे पुन्हा लाभ दिला जाणार नाही. तसेच नवीन विहीर बांधकामासाठी एकदा लाभ घेतल्यास पुढील 20 वर्षे त्या घटकासाठी लाभ मिळणार नाही.
योजनेअंतर्गत नवीन विहीरसाठी कमाल 4 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी 2 लाख रुपये, इनवेल बोअरिंगसाठी 40 हजार रुपये, वीज जोडणीसाठी 20 हजार रुपये, पंप संचासाठी 40 हजार रुपये, सोलर पंपासाठी 50 हजार रुपये, एचडीपीई / पीव्हीसी पाईपसाठी 50 हजार रुपये, ठिबक व तुषार सिंचन संचासाठी अनुक्रमे 97 हजार व 47 हजार रुपये, यंत्रसामुग्रीसाठी 50 हजार रुपये तसेच परसबागेसाठी 5 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीतील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










