सांगली : मिरज तालुक्यातील खंडाळा–पळशी–कराड–कुंडल–सांगली–अंकली (राज्य महामार्ग क्र. १४२) या मार्गावरील शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकीदरम्यानचा रस्ता सुधारणा कामासाठी ३० जानेवारी २०२६ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी निर्गमित केले आहेत.
मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व ११६ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश देण्यात आले असून, या कालावधीत संबंधित मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळवण्यात येणार आहे.
निश्चित करण्यात आलेला पर्यायी वाहतूक मार्ग
इस्लामपूरकडून कर्नाळ चौकीकडून सांगलीत जाणाऱ्या वाहनांसाठी – शिवशंभो चौक – जुना बुधगाव रोड – पट्टणशेट्टी होंडा शोरुम – टी. व्ही. एस. शोरुम – कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात जाता व येता येईल.
पलूस-कुंडल कडून कर्नाळ चौकीकडून शहरात जाणाऱ्या वाहनांसाठी – शिवशंभो चौक – जुना बुधगाव रोड – पट्टणशेट्टी होंडा शोरुम – टी.व्ही.एस. शोरूम – कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात जाता व येता येईल.
रस्त्याच्या दुरुस्तीच्या ठिकाणी तसेच वाहतूक वळवण्यात येणाऱ्या सर्व भागांमध्ये मोठ्या आकाराचे माहितीदर्शक फलक, रात्रीसाठी रिफ्लेक्टर, रेडियमयुक्त दिशादर्शक फलक व ब्लिंकर्स बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदारांनी २४ तास सुरक्षा रक्षक नेमणे आणि रस्त्यावर विद्युत पुरवठा सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कामाच्या कालावधीत कोणताही अपघात, अनुचित प्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदार पूर्णपणे जबाबदार राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: १०वी–१२वी परीक्षांसाठी सांगली जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवा; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे निर्देश.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










