सांगली जिल्ह्यात 23 फेब्रुवारीपासून रोजगार मेळावे; दहावी ते पदव्युत्तर पात्र उमेदवारांसाठी संधी, तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली जिल्ह्यात आयोजित रोजगार मेळाव्याचे प्रतीकात्मक छायाचित्र.

सांगली : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध तालुक्यांत रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर पात्रता असलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे संधी मिळणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आयटीआयच्या समन्वयातून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संबंधित तालुक्यातील शासकीय आयटीआयमध्ये सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मेळावे होणार आहेत.

तालुकानिहाय तारखा

  • शिराळा, उरूण ईश्वरपूर – 23 फेब्रुवारी 2026
  • विटा, कडेगाव – 25 फेब्रुवारी 2026
  • सांगली – 27 फेब्रुवारी 2026
  • आटपाडी – 2 मार्च 2026
  • पलूस, तासगाव – 4 मार्च 2026
  • जत, कवठेमहांकाळ – 6 मार्च 2026

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उद्योजकांकडून विविध पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुकांनी मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन प्रती सोबत आणाव्यात.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, विजयनगर, सांगली येथे संपर्क साधता येईल. (संपर्क : 0233-2990383).

हेही वाचा: आजार नाही अडथळा; सांगलीत एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी 1 मार्चला वधू-वर परिचय मेळावा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा