सांगली : सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दरम्यान तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात सकाळपासून एकही मतदान झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बलगवडे गावाच्या गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पासाठी साडेबारा हजारांहून अधिक झाडांची कत्तल झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे.
सौर ऊर्जा प्रकल्प गावाबाहेर हलवावा, या मागणीसाठी बलगवडे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज बलगवडे गावातील एकही मतदार मतदानासाठी घराबाहेर आला नाही.
बलगवडे गावात सुमारे 2300 मतदार असून, गावात दोन मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र दुपारपर्यंत एकही मतदान न झाल्याने निवडणूक यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या या भूमिकेनंतर प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, तसेच ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी प्रशासकडून काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात सकाळी 11.30 पर्यंत 20.30 टक्के मतदान; पलूस, वाळवा तालुक्यांत प्रतिसाद तुलनेने अधिक.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










