सांगली : गावांच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान’ (RGSA) अंतर्गत हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यशाळेत सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना GPDP आराखड्याचे महत्त्व, नियोजनाची प्रक्रिया आणि लोकसहभागाच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा कसा उपयुक्त ठरतो, याबाबत माहिती देण्यात आली. गावातील आर्थिक संसाधनांचा योग्य वापर, उपलब्ध निधीचे नियोजन आणि विकासकामे प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, यावर भर देण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ग्रामपंचायत स्तरावर नियोजन प्रक्रियेला दिशा मिळणार असून, गावांच्या विकासकामांमध्ये अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: गुटखा उत्पादकांवर मकोका लागू करण्याचा सरकारचा निर्णय; पण सांगलीत अंमलबजावणीचे आव्हान कायम.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









