सांगली : सांगली शहरातील ऐतिहासिक काळीखण परिसरात सुरू झालेल्या ‘The Evening Retreat’ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळच्या वेळेत कुटुंबांसह नागरिक मोठ्या संख्येने काळीखण परिसराला भेट देताना दिसत आहेत.
महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार, काळीखण सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमात म्युझिकल फाउंटन, लेझर शो, व्हिडिओ प्रोजेक्शन, आकर्षक प्रकाशयोजना तसेच सुबक दगडी बांधणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे सायंकाळच्या वेळेत परिसरात नागरिकांची उपस्थिती वाढलेली दिसून येत आहे.
नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, काळीखण परिसर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तसेच सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी सांगलीतील एक विशेष ठिकाण ठरत आहे. काही नागरिकांनी हा परिसर छायाचित्रणासाठीही आकर्षक असल्याचे सांगितले.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, ‘The Evening Retreat’ उपक्रमादरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी सुरक्षा, स्वच्छता, माहितीफलक आणि प्रवेश नियंत्रणाची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी ठरवून दिलेल्या वेळा आणि नियमांचे पालन करून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे काळीखण परिसराचा कायापालट झाला असून, शहरातील सार्वजनिक जागांचा नियोजनबद्ध वापर आणि सायंकाळच्या वेळेत नागरिकांसाठी विरंगुळ्याचे एक नवीन ठिकाण उपलब्ध झाले आहे.
हेही वाचा: प्रभाग क्रमांक ८ मधून माजी नगरसेवक विष्णू माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रचाराला सुरुवात.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










