Sangli Today | सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला असला, तरी महायुती आणि महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय 23 डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
भाजपच्या महायुतीच्या पातळीवर हालचाली वाढल्या असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट), जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपब्लिकन यांच्याशी जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. मित्रपक्षांकडून जागांची मागणी मांडण्यात आली असून, संबंधित पक्षांना उमेदवारांच्या संभाव्य याद्यांसह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात प्राथमिक पातळीवर चर्चा झाली असली, तरी अंतिम सूत्र ठरलेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लक्षात घेऊन पुढील रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम हे आगामी महापालिका निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत सहभागी होणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या अंतिम निर्णयानंतरच उमेदवारांची नावे जाहीर होतील, अशी शक्यता असून, येत्या काही दिवसांत सांगलीतील राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा: तासगावमध्ये ‘काका गटाचे’ जोरदार पुनरागमन; संजय काका पाटलांनी पुन्हा एकदा सिद्ध केली राजकीय ताकद.
- शिराळ्यातील बेलदारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी










