Miraj Crime News | सांगली : शहरातील गणेश तलाव परिसरात शनिवारी रात्री एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत निखिल कलगुटगी (रा. मिरज) गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सात ते आठ जणांच्या गटाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. डोक्यात गंभीर घाव झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनास्थळावर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असून तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. या हल्ल्यामागे टोळीयुद्ध किंवा राजकीय वैमनस्याची पार्श्वभूमी असू शकते, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.
दरम्यान, मिरज पोलिसांनी गुन्हे अन्वेषण पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: संख येथे २०० हेक्टरमध्ये उभारणार हजार कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प.