सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 चा निकाल जाहीर झाला असून, महापालिकेतील नवीन राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण 78 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 39 जागांवर विजय मिळवत सर्वाधिक संख्याबळ प्राप्त केले आहे. त्यानंतर काँग्रेसने 18, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने 16, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने 3 तर शिवसेना (शिंदे गट) ने 2 जागांवर विजय मिळवला आहे.
या निकालानंतर सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत बहुपक्षीय सभागृह तयार झाले असून, पुढील सत्तास्थापन व कारभाराच्या दृष्टीने पक्षीय बलाबल महत्त्वाचे ठरणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडली असून, प्रशासनाकडून अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पक्षनिहाय विजयी जागा
भाजप – 39
काँग्रेस – 18
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 3
शिवसेना (शिंदे गट) – 2
प्रभागनिहाय विजयी उमेदवार (संक्षेप)
प्रभाग 1 – रवींद्र सदामते, माया गडदे, पद्मश्री पाटील, चेतन सूर्यवंशी (भाजप)
प्रभाग 2 – प्राजक्ता धोत्रे (भाजप), गजानन मगदूम (राष्ट्रवादी AP), मालुश्री खोत (भाजप), प्रकाश पाटील (भाजप)
प्रभाग 3 – संदीप आवटी (भाजप), सागर वनखंडे (शिंदेसेना), शैला दुर्वे, रेश्मा चौधरी (राष्ट्रवादी AP)
प्रभाग 4 – निरंजन आवटी, मोहन वाटवे, विद्या नलवडे, अपर्णा शेटे (भाजप)
प्रभाग 5 – शिरीन पिरजादे (राष्ट्रवादी AP), बबिता मेंढे, संजय मेंढे (काँग्रेस), करण जामदार (राष्ट्रवादी AP)
प्रभाग 6 – मैनुद्दीन बागवान (राष्ट्रवादी AP), आझम काझी (राष्ट्रवादी AP), बिलकिस बुजरूक, मुब्बशिरीन बागवान (काँग्रेस)
प्रभाग 7 – गणेश माळी, बानु जमादार (भाजप), उज्वला कांबळे, दयानंद खोत
प्रभाग 8 – दीपक वायदंडे, योगिता राठोड (भाजप), मीनाक्षी पाटील, विष्णू माने (राष्ट्रवादी AP)
प्रभाग 9 – संतोष पाटील, वर्षा सरगर, रोहिणी पाटील, अतुल माने (भाजप)
प्रभाग 10 – जगन्नाथ ठोकळे, गीता पवार, प्रकाश मुळके (भाजप), वर्षा निंबाळकर (काँग्रेस)
प्रभाग 11 – हर्षवर्धन पाटील, रमेश सर्जे, अश्विनी कोळेकर, अंजली जाधव (काँग्रेस)
प्रभाग 12 – लक्ष्मी सरगर, रईसा शिकलगार, संजय यमगर, धीरज सूर्यवंशी (भाजप)
प्रभाग 13 – अभिजीत कोळी (राष्ट्रवादी SP), दीपाली पाटील, अश्विनी कदम (काँग्रेस)
प्रभाग 14 – अनिता पवार, मनीषा कुकडे, उदय बेलवलकर (भाजप), युवराज बावडेकर (शिंदेसेना)
प्रभाग 15 – मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, स्मिता यमगर, सोनल पाटील (काँग्रेस)
प्रभाग 16 – स्वाती शिंदे (भाजप), राजेश नाईक, सलमा शिकलगार, मयूर पाटील (काँग्रेस)
प्रभाग 17 – लक्ष्मण नवलाई (भाजप), प्रार्थना शिंदे, साक्षी बोरगावे, दिग्विजय सूर्यवंशी (राष्ट्रवादी AP)
प्रभाग 18 – गाथा जगदाळे, वैशाली गवळी (भाजप), अभिजीत भोसले, नसीमा नाईक (राष्ट्रवादी AP)
प्रभाग 19 – अलका ऐवळे, कीर्ती देशमुख (भाजप), सुरेश बंडगर, युवराज गायकवाड (राष्ट्रवादी SP)
प्रभाग 20 – अत्तहर नायकवडी, रेखा कांबळे, अश्विनी कोळी (राष्ट्रवादी AP).
हेही वाचा: जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह; सहाजणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









