विटा (जि. सांगली) : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे आरफळ कालव्यात पडून सहा वर्षांच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजवीर सोमनाथ जाधव (वय ६, रा. आळसंद) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना १५ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजवीर हा विटा–कुंडल रस्त्यावरील आरफळ कालव्यावरील पुलावर पाणी पाहत असताना अचानक तोल जाऊन कालव्यात पडला. कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने काही क्षणांतच तो पाण्यात दिसेनासा झाला. ही घटना तेथून जाणाऱ्या काही महिलांनी पाहिली. त्यांनी आरडाओरड केली; मात्र त्या वेळी मदतीसाठी कोणीही पुरुष उपस्थित नसल्याने तातडीने बचाव करता आला नाही.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी आरफळ कालव्याच्या काठावर गर्दी केली. काही ग्रामस्थांनी पाण्यात उतरून शोधमोहीम सुरू केली. मात्र अनेक तास प्रयत्न करूनही यश आले नाही. अखेर घटनेच्या ठिकाणापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर कालव्यात राजवीरचा मृतदेह आढळून आला.
राजवीर हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होता. तो अभ्यासात हुशार, शांत स्वभावाचा आणि शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण आळसंद गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत भाजप सर्वाधिक जागांवर विजयी; प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










