महापालिका निवडणुकीत कुणाची युती? सांगली–मिरज–कुपवाडमध्ये जागावाटपावरून राजकीय संभ्रम कायम

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी प्रमुख राजकीय आघाड्या आणि युतींमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत; मात्र पक्षीय युती होणार की पक्ष स्वबळावर लढणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे.

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर जागांची मागणी करण्यात येत असल्याची चर्चा आहे. भाजप ५० हून अधिक जागांवर दावा करत असल्याचे सांगितले जात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुमारे ३० जागांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मागण्यांवर दोन्ही पक्षांचे अद्याप एकमत होत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मिरजेत अजित पवार गटात आजी-माजी नगरसेवक तसेच माजी महापौरांचा प्रवेश झाल्यामुळे अजित पवार गटाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षित जागावाटप न झाल्यास अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीतही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जागावाटपावरून मतभेद कायम असल्याचे दिसून येते. 

निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत तर हा जागावाटपाचा तिढा सुटेल की नाही, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. त्यामुळे सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीत पक्षीय युती की स्वबळ, हे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे

हेही वाचा: सांगली पोलिस ॲक्शन मोडवर; दोन टोळ्यांवर ‘मोक्का’चा प्रस्ताव, 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा