सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण ७९० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सात दिवसांच्या कालावधीत २,७५८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडे १,०६२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.
निवडणूक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम दिवशीच विक्रमी ७९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. या अर्जांमधून प्रत्यक्षात ७९० वेगवेगळे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभागनिहाय आकडेवारीनुसार काही प्रभागांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत असून, विशेषतः प्रभाग समिती क्रमांक ३ आणि ४ अंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आजपासून नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया सुरू होत असून, त्यानंतर उमेदवारी माघारीचा टप्पा पार पडणार आहे. छाननी व माघारीनंतर सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: वयोमर्यादेमुळे उमेदवार अपात्र; आमदार गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे वयोसवलतीची मागणी.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










