Sangli Municipal Election : 15 जानेवारीची सार्वजनिक सुट्टी कुणा-कुणाला लागू? शासनाच्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घ्या

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर | प्रातिनिधिक छायाचित्र – Sangli Today

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी राज्यातील ज्या महापालिका क्षेत्रांमध्ये मतदान होणार आहे, त्या सर्व ठिकाणी लागू राहणार आहे.

राज्य प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, राज्यातील एकूण 29 महापालिका क्षेत्रांमध्ये मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहील. यामध्ये सांगली–मिरज–कुपवाडसह मुंबई महानगर प्रदेशातील तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे.

या आदेशानुसार, मतदानाच्या दिवशी संबंधित महापालिका हद्दीत कार्यरत असणारी शासकीय व निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, बँका बंद राहणार आहेत. केंद्र शासनाची कार्यालये तसेच सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनाही ही सुटी लागू राहणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ज्या मतदारांची नावे संबंधित महापालिका मतदार यादीत आहेत, पण जे मतदानाच्या दिवशी आपल्या मतदारसंघाबाहेर नोकरी, शासकीय कामकाज किंवा अन्य कारणास्तव कार्यरत आहेत, अशा मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी लागू राहील, असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी मतदारसंघाबाहेर नोकरी करणाऱ्या मतदारांना अडथळा येऊ नये आणि जास्तीत जास्त मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगलीत तृतीयपंथीयांना ‘या’ राष्ट्रीय हेल्पलाईनचा वापर करण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा