महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; मिरजेत मैत्रीपूर्ण लढत, सांगली-कुपवाडमध्ये नकार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : सांगली महापालिका निवडणूक – काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची भूमिका चर्चेत

सांगली : गेल्या दोन दिवसांपासून सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू असून, जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांनी जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करत प्रभागनिहाय चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील हे सांगलीत मुक्काम ठोकून असून, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्याशी सलग चर्चा सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात सध्या कोणतीही अधिकृत आघाडी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने सुमारे ३५ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ने ३० जागांवर आपली भूमिका निश्चित केली असून, १७ ते १८ जागांवर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून, एबी फॉर्म लवकरच देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मिरज शहरात मैत्रीपूर्ण लढतीचा विचार केला जात असला, तरी सांगली आणि कुपवाड भागात मैत्रीपूर्ण लढतीस नकार देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही भागांत थेट लढती होण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रियेला वेग आलेला असून, पुढील एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीतील जागावाटपाचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: सांगलीत भाजपविरोधात धारकऱ्यांचे बंड; उमेदवारीत डावलल्याने अपक्ष लढण्याचा पवित्रा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा