उमेदवारी अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद; दोन दिवसांत 1,146 अर्जांची विक्री

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अर्ज विक्रीच्या पहिल्या दोन दिवसांत एकूण 1,146 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.

पहिल्या दिवशी 574, तर दुसऱ्या दिवशी 572 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. ही अर्ज विक्री शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून करण्यात आली.

प्रशासनाच्या माहितीनुसार, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 4 क्षेत्रात सर्वाधिक 220 अर्जांची विक्री झाली आहे. त्यापाठोपाठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 6 क्षेत्रात 211 अर्जांची विक्री झाली आहे. दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 2 आणि 4 येथे अर्ज विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज विक्रीसाठी सर्व कार्यालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, माहिती कक्ष तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या केवळ अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीत कुणाची युती? सांगली–मिरज–कुपवाडमध्ये जागावाटपावरून राजकीय संभ्रम कायम.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा