SMKC News : कर्तव्यात कसूर प्रकरणी प्रभारी मुख्य उद्यान अधीक्षक निलंबित

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sangli Municipal Officer Suspended

SMKC News Today | सांगली : महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व उद्यान देखभाल विभागात कसूर झाल्याच्या प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांनी कडक कारवाई केली आहे. प्रभारी मुख्य उद्यान अधीक्षक डॉ. रवींद्र ताटे यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून, सहा कनिष्ठ अभियंत्यांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.


डॉ. ताटे यांच्या कार्यात असमाधानकारक कामगिरी व जबाबदारीत त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तर कनिष्ठ अभियंते पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोरे वगळता इतर सर्व मानधन तत्त्वावर कार्यरत आहेत.


उद्यानांची दुरुस्ती, देखभाल, तसेच धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याच्या सूचनांनुसार वेळेवर कार्यवाही झाली नाही. याशिवाय दैनंदिन कामकाजावरील अहवाल अपुरे राहिल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा: कर्नाटकातील व्यापार्‍याचा स्वतःच्याच लुटीचा बनाव; पोलिस तपासात सत्य उघड.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.