Sangli News : ईश्वरपूर व आष्ट्यात बंद, तर सांगलीत पडळकर समर्थकांकडून पोस्टरला दुग्धाभिषेक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
फोटो: सोशल मीडिया

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री स्व. राजारामबापू पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. शनिवारी (20 सप्टेंबर) ईश्वरपूर आणि आष्टा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. इस्लामपूर शहरातील व्यापाऱ्यांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदवला.

विवादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पेठ–सांगली महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. या ठिकाणी जयंत पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, सांगलीतील राममंदिर चौकात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. येथे पडळकर समर्थकांनी पडळकरांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करत पडळकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. एकंदरीतच जिल्ह्यात जयंत पाटील आणि पडळकर समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

हेही वाचा: प्रेयसीच्या वाढदिवसासाठी तरुणान केल असकाही, मित्रासह दोघे गजाआड.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.